थोडं मनातलं होरेगल्लू ....
थोडं मनातलं होरेगल्लू .... ' होरेगल्लू ' शब्द वाचून आश्चर्य वाटले ना ? साहजिकच आहे. हा कानडी शब्द आहे. सुधा मूर्ती यांचं एक पुस्तक आहे ' ओल्ड मॅन अँड हिज गॉड ' या नावाचं. त्या पुस्तकात ही कथा आहे. होरेगल्लू याचा शब्दशः अर्थ होतो एक पसरट दगड, जो वजन पेलू शकतो. कानडी भाषेत होरे म्हणजे ओझे आणि कल्लू म्हणजे दगड. या दोन शब्दांचा संधी होताना होरे +कल्लू = होरेगल्लू असा शब्द तयार होतो. संधी होताना ' क ' चा ' ग ' होतो. होरेगल्लू म्हणजे तीन दगडांनी मिळून तयार झालेला बाक किंवा बेंच. दोन उभे दगड आणि त्यावर ठेवलेला एक आडवा दगड मिळून होरेगल्लू तयार होत असे. पूर्वीच्या काळी वाहतुकीची फारशी साधने नव्हती. बराचसा प्रवास हा पायीच होई. अशा वेळी डोक्यावर असलेले ओझे वाटसरू या या होरेगल्लूवर ठेवत. त्यावर बसून काही काळ विश्रांती घेत आणि मग पुढच्या प्रवासाला रवाना होत असत. आपण आपल्या सोयीसाठी इथे त्याचा दगडाचा पार किंवा बसायचा कट्टा असा अर्थ घेऊ या. होरेगल्लू या शब्दाचा प्रतिकात्मक अर्थ म्हणजे रडण्यासाठी असलेला आधाराचा खांदा असाही घेता येईल. जिथे बसून आपली सुखदुःखे एखाद्या व्...