धन्यवाद हो धन्यवाद...
थोडं मनातलं धन्यवाद हो धन्यवाद... ' होम मिनिस्टर ' नावाचं एक धारावाहिक आहे. टीव्ही वर सुरु असणाऱ्या या शोचा आनंद भगिनी वर्ग मोठया प्रमाणात घेताना आढळून येतो. ' भावजी ' या नावाने लोकप्रिय असणारे आदेश बांदेकर या शोचे अतिशय कुशल आणि सहज संचालन करतात. अर्थात मला तुमच्याशी या शोबद्दल बोलायचं नाही. पण या शोमध्ये आदेश बांदेकर एक प्रश्न हमखास विचारतात. तो माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. ते म्हणतात, ' वहिनी, आभार मानायचे तर कोणाचे मानाल किंवा धन्यवाद द्यायचे तर कोणाला द्याल ?' मग ती भगिनी आपल्या माहेरचे, सासरचे किंवा आणखी कुणा व्यक्तीचे आभार मानते किंवा धन्यवाद देते. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ती त्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. याचं तात्पर्य असं की आपल्या जीवनात घडलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल, यशाबद्दल कोणाची तरी मदत आपल्याला झालेली असते. आपण मिळवलेलं यश किंवा केलेली प्रगती ही एकट्याची असू शकत नाही. आपण एकटे त्याचे श्रेय घेऊ शकत नाही. म्हणून आजच्या परिस्थितीत या यशाच्या पायरीपर्यंत पोहोचताना आपल्याला अनेक लोकांची मदत झालेली असते. त्या सगळ्य...