Posts

Showing posts from March, 2023

थोडं मनातलं - रामका गुणगान करिये

Image
थोडं मनातलं   रामका गुणगान करिये पं भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर या दोन भारतरत्नानांनी गायिलेले ' गुणगान करिये रामका ' हे अतिशय सुंदर गीत. हे गीत ऐकताना जणू समाधी लागते. तशी रामाची कुठलीही गाणी गोडच ! मग ते गीतरामायण असो वा अन्य कुठलीही गाणी. मुळात रामायणच गोड ! पेढ्याचा कुठलाही भाग खाल्ला तरी तो गोडच लागणार ना ! तशीच अवीट गोडीची ही रामकथा. या रामकथेने हजारो वर्षांपासून अनेकांना प्रेरणा दिली. शेकडो लेखक आणि हजारो कवी लिहिते झाले. पण रामकथेची थोरवी संपली का ? वर्णन करून झाली का ? ती कधीच संपणार नाही. रामकथा म्हणजे विविध डोळे दिपविणाऱ्या रत्नांनी भरलेला एक सागर आहे. जेवढी खोल बुडी माराल तेवढी रत्ने हाताला लागतील. समुद्राला आपण रत्नाकर म्हणतो. रामकथा सुद्धा या अर्थाने एक रत्नाकरच !   मी सुरुवातीला उल्लेख केलेल्या गीताचे सुरुवातीचे शब्द आहेत ' रामका गुणगान करिये.' रामाचं गुणगान कशाकरता करायचं ? आणि गुणगान केलं तरी कोणाचं जातं ? ज्याच्यात काही अलौकिक असे गुण आहेत, अशाच व्यक्तीचं आपण गुणगान करतो ना ! आपण रामाचं गुणगान करतो, कृष्णाचं गुणगान करतो, शिवाजी महाराजांचं गुणगान करत...

थोडं मनातलं कल आज और कल

Image
थोडं मनातलं  कल आज और कल  हिंदीत काल आणि उद्यासाठी एकच शब्द आहे. तो म्हणजे ‘ कल ‘. मराठीत आपण काल आणि उद्या म्हणतो. हिंदी आणि अहिराणी बोलीत एक साम्य या बाबतीत मला आढळले. ते म्हणजे अहिराणी भाषेत बोलताना काही लोक उदयाला सुद्धा काल म्हणतात. बहुधा हा काल शब्द ‘ काळ ‘ वरून आला असावा. कालचा दिवस गेला तो भूतकाळ आणि उद्याचा येणारा दिवस तो भविष्यकाळ. आणि आजचा आपल्या हातात असलेला वर्तमानकाळ. लहानपणी मला कोणी एखादी चांगली गोष्ट करायला सांगितली की मी आईशी बोलताना म्हणत असे, ‘ मी उद्यापासून करीन. ‘ उदा. सकाळी लवकर उठून व्यायाम करणे, रोज नियमाने अभ्यास करणे, घरातील वडिलधाऱ्या मंडळीना नमस्कार करणे इ. पण आई म्हणायची, अरे वेड्या, उद्या कधी येत नसतो. म्हणून जे काही करायचे ते आजपासून कर. खरं म्हणजे तिचं ते बोलणं मला लहानपणी फारसं कळायचं नाही. मला वाटायचं असं कसं होईल ? आजच्या दिवसानंतर येणारा पुढचा दिवस म्हणजे उद्या नाही का ? तो तर येणारच आहे ना !  पण आईचे ते बोलणे मला पुढे कळायला लागले. आजच्या नंतरचा दिवस म्हणजे ‘ उद्या ‘ आपल्या हातात येतो सुद्धा. पण यावेळी एक जादू झालेली असते. आपल्या हाता...

थोडं मनातलं अजिंठा लेणी आणि बुद्ध दर्शन - भाग ३

Image
 थोडं मनातलं  अजिंठा लेणी आणि बुद्ध दर्शन - भाग ३ आपला सारथी आणि मित्र असलेला छन्न याला निरोप दिल्यानंतर मजल दरमजल करीत सिद्धार्थ मगध नगरीजवळ येऊन पोहोचला. एका पिंपळ वृक्षाखाली त्याने आपले आसन मांडले. त्याचे तेजस्वी मुखमंडल, राजबिंडे रूप, पुष्ट बाहू पाहून नगरातील स्त्री पुरुष हा कोणीतरी सिद्ध पुरुष दिसतो म्हणून त्याच्या दर्शनाला येऊ लागले. मगधापती बिंबिसार हा गुणिजनांचा चाहता होता. त्याच्या कानावर ही वार्ता गेली. त्याने आपल्या गुप्तहेरांकरवी त्याच्याबद्दल तपास करवला. गुप्तहेरांनी तपास करून बिंबिसाराला सांगितले, ' महाराज, हा तोच शाक्य कुलोत्पन्न युवराज गौतम आहे, ज्याने आपलं राज्य त्यागून संन्यास पत्करला आहे. याच युवराजांबद्दल ऋषींनी अशी भविष्यवाणी केली होती की एक तर तो चक्रवर्ती सम्राट तरी होईल किंवा बुद्ध तरी होईल. '  स्वतः मगधापती बिंबिसाराने गौतमाची भेट घेण्याचे ठरवून वनाकडे प्रस्थान केले. ध्यानस्थ बसलेल्या सिद्धार्थाचे देखणे रूप पाहून तो भारावून गेला. सिद्धार्थाशी त्याने प्रेमळ संवाद साधला. तो म्हणाला, ' हे शाक्य युवराज, आपला जन्म एका पराक्रमी अशा राजवंशांत झाला आहे. ज...

थोडं मनातलं अजिंठ्याच्या लेण्यातून घडणारे बुद्ध दर्शन - भाग २

Image
थोडं मनातलं  अजिंठ्याच्या लेण्यातून घडणारे बुद्ध दर्शन - भाग २  अजिंठ्याच्या लेण्यांतून जी भित्तिचित्रे आणि गौतम बुद्धांची विविध रूपे असलेली शिल्पे आपल्याला दृष्टीस पडतात, त्या प्रत्येकाच्या मागे काही इतिहास किंवा काही कथा दडलेली आहे. या चित्रांचे किंवा शिल्पांचे अर्थ गौतम बुद्धांचे जीवन, बुद्ध वांड्मयातील जातक कथा इ. समजून घेतल्याशिवाय आपल्या लक्षात येत नाही. आज या लेण्यातील चित्रे आणि शिल्पे काळानुसार त्यांचे मूळ रूप आणि सौंदर्य काही प्रमाणात गमावून बसली असली तरी एकेकाळच्या संस्कृतीच्या वैभवाच्या हा काळावर उमटवलेला अमीट असा ठसा आहे. गौतम बुद्ध, त्यांचे अजरामर असे तत्वज्ञान हा आपला वैभवशाली वारसा तर आहेच पण ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य अशी देणगी आहे.  आपण  बुद्धांचे जीवन आणि ही अजिंठ्याची लेणी अशा दोन गोष्टी एकत्र लक्षात घेत गेलो, तर या लेण्यातील चित्रे आणि शिल्पे यावर प्रकाश पडतो. त्यानिमित्ताने जेव्हा बुद्धांच्या चरित्रातील घटना आपण पाहू लागतो, तेव्हा मनोरम असे बुद्ध दर्शन घडते. हे घडणारे बुद्ध दर्शन लेण्यातील शिल्प आणि चित्र यांच्यापलीकडचेही असते. म्हणूनच ले...