भिंत
थोडं मनातलं भिंत आमच्या घरासमोर असणारा एक छान, प्रशस्त बंगला. आधीच्या मालकाने तो विकला आणि दुसऱ्या एका श्रीमंत व्यक्तीने तो विकत घेतला. तसा बंगला छान असला तरी तो बांधून अनेक वर्षे झाली होती. साहजिकच नवीन मालकाला आपण तेथे राहायला जाण्यापूर्वी त्याची दुरुस्ती, रंगरंगोटी नव्याने करावी असे वाटले. त्याप्रमाणे त्यांनी कामही सुरु केले. त्यांच्या शेजारी असेच एक छोटेसे दुमजली घर होते. त्या घरात खाली तळमजल्यावर एक आणि वरच्या मजल्यावर दुसरे अशी दोन भाडेकरू बिऱ्हाडे राहत होती. घराचे काम सुरु असल्याने त्या घरमालकाच्या दिवसातून अनेक वेळा चकरा होत असत. कधी कधी शेजारील भाडेकरुंकडे काही लागले तर तो जात असे. समोर किंवा आजूबाजूला राहणाऱ्यांकडेही तो जाई, त्याच्या बोलण्यातून एक नवा शेजारी आपल्या शेजारी येणार याची बाजूला राहणाऱ्या लोकांना जाणीव झाली. तो देखील शेजारी जाऊन तुम्ही सगळे किती चांगले आहात असे म्हणत असे. शेजारी देखील त्याला चहापाण्याचा आग्रह करीत. त्या नवीन घरमालकाच्या घराभोवती आणि शेजारच्या घराभोवती एक सामायिक अशा प्रकारची कुंपणाची भिंत होती. तिची उंची साधारण चार ...